मथुरा : साखर कारखाना आणि ऊस खात्याचे मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी छाता साखर कारखान्याच्या पुनर्स्थापनेसाठी कोनशिला पूजन केले. साखर कारखाना सुरू झाल्यनंतर शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल. युवकांना रोजगार मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्री चौधरी म्हणाले की, साखर कारखान्यात ऊस गाळपासह वीज उत्पादन व इतर प्रोजेक्टही राबवले जातील. त्यामुळे कारखाना फायद्यात राहील. तीन हजार टीसीडी क्षमतेने कारखाना ऊस गाळप करेल. त्याचा पाच हजार टीसीडीपर्यंत क्षमता विस्तार केला जाईल. आमचे डबल इंजिनचे सरकार अनेक विकासकामे करीत आहे.
ऊस राज्यमंत्री संजय गंगवार म्हणाले की, कारखान्याच्या व्यवस्थापनामुळे विभागातील जनतेला याचा फायदा होईल. सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलावा यासाठी हे प्रयत्न चालवले आहेत. योगी सरकारने उच्चांकी ऊस बिले अदा केली आहेत.
आमदार गोवर्धन मेघश्याम यांचे भाषण झाले. उत्तर प्रदेश राज्य साखर महामंडळ लिमिटेडचे कार्यकारी संचालक रमाकांत पांडे यांनी सांगितले की, कारखान्यासोबत शेतकऱ्यांचा आणि विभागाचा विकास होईल. यावेळी माजी आमदार चंदन सिंह, मंत्री प्रतिनिधी नरदेव चौधरी, माधव दास मौनी बाबा, जिल्हाधिकारी पुलकित खरे, एसएसपी शैलेश पांडे आदी उपस्थित होते.