नई दिल्ली: देशभरात रविवारी कोरोना वायरस (Coronavirus) चे 62,064 नवे रुग्ण समोर आले असून आतापर्यंत कोरोना संक्रमित लोकांची एकूण संख्या वाढून 22,15,074 इतकी झाली आहे. केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय च्या मतानुसार गेल्या 24 तासात देशात 1,007 कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. ज्यामुळे मृतांचा एकूण आकडा वाढून 44,386 झाला आहे तर 15,35,744 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
स्वास्थ्य मंत्रालयानुसार देशभरात कोरोना रुग्णांचा रिकवरी रेट 69.33 टक्के झाला आहे आणि पॉजिटिविटी रेट वाढून 13.01 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासात 54,859 लोक बरे झाले आहेत. देशभरामध्ये 6,34,945 कोविड-19 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशामध्ये सातत्याने चौथ्या दिवशी कोविड-19 चे 60,000 पेक्षा अधिक नवे रुग्ण समोर आले आहेत.
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) च्या अनुसार देशात आतापर्यंत एकूण 2,45,83,558 स्वॅब तपासण्यात आली आहेत. यापैकी रविवारी 4,77,023 स्वॅब तपासण्यात आले.
महाराष्ट्र मध्ये रविवारी कोविड-19 चे सर्वाधिक 12,248 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच राज्यात संक्रमित लोकांची संख्या वाढून 5,15,332 इतकी झाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, 390 लोकांचा कोरोना वायरस संक्रमणाने मृत्यू झाला आहे. राज्यात मृतांची संख्या वाढून 17,757 इतकी झाली आहे.
तर झारखंड मध्ये कोविड-19 मुळे रविवारी ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 177 लोकांचा मृत्यु झाला आहे. राज्य सरकार ने सांगितले की कोरोनाचे 530 नवे रूग्ण आढळल्याने एकूण संख्या 18,156 झाली आहे. सध्या प्रदेशात कोविड-19 च्या 8,981 इतकया रुग्णांवर उपचार सुरु असून 8,998 इतके लोक बरे झाले आहेत.
छत्तीसगढ़ मध्ये कोविड-19 चे 285 नवे रुग्ण समोर आले असून एकूण संख्या 12,148 इतकी झाली आहे. कोरोनामुळे सहा लोक मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांचा आकडा 96 वर पोचला आहे.
ते म्हणाले की, बरे झाल्यानंतर 227 लोकांना डिस्चार्ज दिला आहे. छत्तीसगढ़ मध्ये सध्या 3,243 रुग्णांवर उपचार सुरु असून, 8,809 लोक बरे झाले आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.