फिजी: फिजीचे प्रधानमंत्री वोरके बैनीमारामा यांनी सांगितले की, फिजीमध्ये कोरोनाचा फैलाव फार नसला तरी साखर उद्योगासह अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांवर कोरोनाचा परीणाम झाला आहे.
त्यांनी सांगितले की, कोरोनामुळे साखर उत्पादन आणि निर्यातीवरही परीणाम झाला आहे. बैनीमारामा यांनी सांगितले की, जागतिक सीमा प्रतिबंध, व्यापार बाधा आणि संकुचित वितरण चैनल्स ने फिजियन साखर निर्यातीला धक्का दिला आहे.
त्यांनी सांगितले की, विदेशी तंत्रज्ञांना आणण्यामध्ये असमर्थता असल्याने साखर क्षेत्रासाठी अडचणी वाढल्या आहेत.