हिमालयातील ‘बुरांश’ वनस्पतीच्या साह्याने कोरोनावर मात शक्य

इंडियन इन्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मंडी (IIT) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजीच्या (ICGEB) संशोधकांनी हिमालयातील एका वनस्पतीच्या पानांमध्ये फायटोकेमिकल्सचा शोध लावला आहे. या फायटोकेमिकल्सपासून कोविड १९ वर उपचार केले जाऊ शकतात असे सांगण्यात येत आहे. संशोधनात आढळले आहे की, हिमालयात आढळणाऱ्या बुरांश (Rhododendron arboreum) या वनस्पतीमध्ये अँटीव्हायरल घटक आहेत, ते विषाणूशी लढा देऊ शकतात. या संशोधनाचे निष्कर्ष अलिकडेच ‘Biomolecular Structure and Dynamics’ जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

यासंदर्भात आजतक डॉट इनवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, या वनस्पतींच्या पानांवर गरम पाणी टाकल्यास त्याच्या अर्कामध्ये क्लिनिक अॅसिड आणि डेरिव्हेटिव्ह पुरेशा प्रमाणात आढळतात. याच्या मॉलिक्युलर डायनॅमिक्स संशोधनात आढळले आहे की, हा फायटोकेमिकल्स विषाणूवर दोन पद्धतीने परिणाम करू शकतो. पानांच्या अर्कापासून नॉन टॉक्सिस खुराक, वेरो E6 सेल्सवर कोणताही प्रतिकूल परिणाम न करता या सेल्समध्ये कोविडचा प्रसार रोखला जातो. आरोग्यासाठी लाभदायी असल्याने बुरांश वनस्पतीची पाने स्थानिक लोकांकडून विविध प्रकारे वापरली जातात असे संशोधनात म्हटले आहे.

आयआयटी मंडीच्या स्कूल ऑफ बेसिक सायन्सचे असोसिएट प्रोफेसर श्याम कुमार मसकापल्ली म्हणाले, ही औषधी केमिकलचा वापर करते. आपल्या शरीरातील सध्याच्या रिसेप्टर्सशी जोडली जाते आणि विषाणूला आपल्या शरीरात प्रवेश करण्यापासून रोखते. अथवा विषाणूची शरीरातील वाढ रोखण्याचा प्रयत्न करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here