नवी दिल्ली : भारतामध्ये कोविड 19 च्या रुग्णांनी 32 लाखाचा आकडा पार केला आहे. बुधवारी पुन्हा कोरोना संक्रमाणात वाढ दिसून आली. बुधवारी 67,151 नवे रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या साडे 24 लाखापेक्षा अधिक आहे.
बुधवारी सकाळी दिलेल्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासात 1.059 लोकांचा मृत्यु झाल्याने मृतांची संख्या वाढून 59,449 झाली आहे. देशामध्ये कोरोना रुग्ण वाढले असून, 32,34,475 झाले आहेत, ज्यापैकी 7,07,267 लोकोंवर उपचार सुरु आहे आणि 24,67,759 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. संक्रमणाच्या एकूण रुग्णांच्या आकड्यात विदेशी नागरीकही सामील आहेत.
आकड्यांनुसहार रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 76.30 टक्के झाला आहे. तर मृत्यु दरात घट झाली आहे आणि हा दर 1.84 टक्के आहे. तर 21.87 टक्के रुग्णांवर उपचार सुरु आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडयांनुसार, देशभरामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत एकूण 3,76,51,512 नमुन्यांची तापसणी गेली आहे, ज्यामध्ये मंगळवारी एक दिवसात 8,23,992 नमुने तपासण्यात आले.
आकड्यांनुसार, गेल्या 24 तासात ज्या 1,059 लोकांचा मृत्यु झाला आहे, त्यापैकी 329 लोक महाराष्ट्रातील आहेत. यानंतर कर्नाटकातील 148, तामिळनाडूतील 107, आंध्रप्रदेशातील 92, उत्तर प्रदेशातील 72, पीश्चिम बंगालचे 58, पंजाबातील 49, गुजरातमधील 20, मध्यप्रदेशातील 19 आणि दिल्ली तसेच झारखंड येथील 17-17 लोक होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.