नवी दिल्ली: भारतात गेल्या 24 तासात 61,267 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आणि 884 लोकांचा मृत्यु झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, एकू, 66,85,083 रुग्णांपैकी 9,19,023 सक्रिय आहेत. 56,62,491 बरे झाले आहेत आणि 1,03,569 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
कोरोनाच्या बाबतीत भारत जगातील अमेरिकेनंतरचा दुसर्या नंबरचा देश आहे. जॉप हॉपकिन्स युनविर्सिटी नुसार, जगामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 10 लाख 22 हजार 976 लोकांचा मृत्यु झाला आहे. यापैकी अमेरिकेमध्ये सर्वात अधिक 2 लाख 7 हजार 808 मृत्यु झाले आहेत, तर भारतात हा आकडा 2 ऑक्टोबरला 1 लाखावर गेला होंता.
रुस मध्ये निर्मिती करण्यात आलेली कोरोनाची लस देशात सर्वात पहिल्यांंदा उपलब्ध हावू शकते. देशामध्ये विकसित दोन लसी तिसर्या टप्प्याच्या परीक्षणात आहेत. आणि ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी ची लसही भारतात तिसर्या टप्प्यात आहे. पण रुस ची लस बनली आहे आणि वापरण्यातही येत आहे. भारत सरकारची रुस सरकारशी या लसीच्या उपलब्धतेबाबत चर्चाही सुरु आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.