ब्रासिलीया : ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूंमुळे ४ हजार २४९ जणांचा मृ्त्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर एका दिवसात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत.
मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू पावलेल्यांची संख्या ३, ४५,०२५ झाली आहे. या कालावधीत नव्याने ८६ हजार ६५२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण १ कोटी ३२ लाख ७९ हजार ८५७ नवे रुग्ण आढळले आहेत.
अमेरिकेनंतर कोविड १९ मुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. जॉन हेल्थ हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेने ११ मार्च २०२० रोजी कोविड १९ या विषाणूला जागतिक महामारी घोषीत केली आहे. भारतातही कोरोनाचा गतीने फैलाव झाला आहे.