वी दिल्ली : पेप्सी, कोका-कोला यांसारख्या प्रमुख शीतपेय उत्पादक कंपन्यांचे उत्पन्न आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कोरोना महामारीच्या आधीच्या स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. कोविड १९च्या दुसऱ्या लाटेचा परिणाम शीतपेयांच्या खपावर होण्याचा परिणाम आहे. याबाबत क्रिसिल रेटिंगने नुकत्यात जारी केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे या कंपन्यांचे उत्पन्न सुमारे २० टक्क्यांनी घटले होते. आणि आता आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये महामारीच्या पहिल्या स्तरापेक्षाही ते १० टक्के कमी राहील असा अंदाज आहे.
अहवालात म्हटले आहे की, शीतपेय उद्योगात पेप्सी, कोका कोला यांसारख्या अमेरिकन कंपन्यांचा दबदबा कायम आहे. त्यांचा बाजारातील एकूण हिस्सा ८० टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशव्यापी कडक लॉकडाउन आणि
त्यानंतर एप्रिल-सप्टेंबर या कालावधीतील मर्यादीत निर्बंध यामुळे मागणीत प्रचंड प्रमाणात घट झाली.
क्रिसिल रेटिंग्जचे संचालक नितेश जैन यांनी सांगितले की, कोरोना महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर लॉकडाउन आणि इतर निर्बंधांमुळे पुन्हा एकदा विक्रीवर परिणाम होणार आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅफेसारख्या ठिकाणी शीतपेयांचा खप हा एकूण खपाचा चौथा हिस्सा असतो. पहिल्या तिमाहीत यावर प्रतिकूल परिणाम होईल. निर्बंध कमी असले तरी यावर्षीचे उत्पन्न महामारीच्या आधीच्या स्तरापेक्षा १० टक्क्यांनी कमी असेल.