नवी दिल्ली: देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या गुरुवारी 10 लाखावर पोचली. गुरुवारी कोरोनाचे 34 हजार 956 नवे रुग्ण आढळले. यापूर्वी सर्वात अधिक 16 जुलै ला 32 हजार 607 लोक कोरोनाग्रस्त आढळले होते. गेल्या 24 तासात 687 रुग्ण मृत पावले आहेत. गुरुवारी 22 हजार 834 रुग्ण बरे झाले आहेत, हीच काय ती दिलासादायक बाब आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार नवे रुग्ण समोर आल्यानंतर देशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या एकूण 10 लाख 3 हजार 832 इतकी झाली आहे. आता कोरोनाच्या 3,42,473 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. कोरोना महामारीपासून आतापर्यंत 25,602 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. आणि 6,35,757 लोग बरे झाले आहेत. एक विदेशी परतला आहे. यादरम्यान एकच चांगली गोष्ट आहे की, कोरोना संक्रमित रुग्णांचा बरे होण्याचा आकडा वाढत आहे. देशामध्ये रिकवरी रेट 65.24 टक्के झाला आहे. कोरोना वायरसा सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे.
मध्य प्रदेशामद्ये गुरुवारी कोरोनाचे 735 नवे रुग्ण समोर आले आहेत. आणि याबरोबरच प्रदेशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता 20,378 पर्यंत पोचली आहे. राज्यात गेल्या 24 तासात या आजारामुळे आणखी सात लोक मृत पावले आहेत. यामुळे राज्यातील मृतांची संख्या आता 689 इतकी झाली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.