नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा फैलाव गतीने होत आहे. त्यामुळे स्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. गेल्या २४ तासांत देशात २३२८५ नवे रुग्ण आढळले आहेत. दररोजच्या रुग्णसंख्येत गतीने वाढ होत आहेत. आता एकूण रुग्णांची स्खाय १,१३,०८,८४६ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ११७ रुग्णांचा मृत्यू झाला. गुरुवारी देशात २२८५४ रुग्ण आढळले होते. आज त्यापेक्षा अधिक रुग्ण झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात १५,१५७ जण कोरोनापासून बरे झाले आहेत.
कोरोनाने संक्रमित झालेल्यांची संख्या बरे झालेल्यांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. सध्या देसात १,९७,२३७ सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात १,५८,३०६ जणांचा या खरतनाक विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या १८ हजारांपेक्षा अधिक आहे. एकूण रुग्णसंख्या आता १,०९,५३,३०३ वर पोहोचली आहे.