नवी दिल्ली: गेल्या 24 तासात 74,442 नव्या कोरोना रुग्णांसह 903 लोकांचा मृत्यु झाला. याबरोबरच भारतात कोविड 19 चा आकडा 66 लाखावर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार एकूण 66,23,816 कोरोनाग्रस्तांपैकी 9,34,427 सक्रिय आहेत. तर 55,86,704 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. आणि 1,02,685 लोकांचा मृत्यु झाला आहे.
कोरोनाच्या बाबतीत भारत जगामध्ये अमेरिकेनंतचा दुसर्या नंबरचा देश आहे. जॉप हॉपकिन्स युनविर्सिटी च्या नुसार, जगात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 10 लाख 22 हजार 976 लोकांचा मृत्यु झाला आहे. यापैकी अमेरिकेमध्ये सर्वात अधिक 2 लाख 7 हजार 808 लोकांचा मृत्यु झाला आहे, तर भारतात हा आकडा 2 ऑक्टोबरला 1 लाखावर पोचला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासात 78,877 रुग्ण कोरोनामुक्त झाले, ज्याबरोबर आतापर्यंत कोरोनामुक्त होणार्यांची संख्या 53 लाख 52 हजार 78 झाली आहे.
कोरोनामुळे मरणार्यांच्या बाबतीत भारत अमेरिका आणि ब्राझील नंतर तिसर्या नंबरवर आहे. ब्राझीलमध्ये कोविड-19 मुळे आतापर्यंत 1 लाख 44 हजार 806 लोकांनी प्राण गमावला आहे. तर मॅक्सिको 78 हजार 78 मृत्युंसह भारताच्या मागे चौथ्या स्थानावर आहे. 30 जानेवारी ला पहिली केस आल्यानंतर गेल्या आठ महिन्यांदरम्यान केवळ सप्टेंबर मध्येच देशामध्ये एकूण कोविड 19 चे 41.53 टक्के म्हणजेच 26 लाख 21 हजार 418 नवे रुग्ण समोर आले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.