कोरोनाचा धोका वाढला, २४ तासांत नवे ५६,२११ रुग्ण, २७१ जणांचा मृ्त्यू

नवी दिल्ली : देशात कोविड १९चा धोका पुन्हा वाढू लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसर, गेल्या २४ तासांत नवे ५६,२११ रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे २७१ जणांचा मृ्त्यू झाला आहे. यासोबतच देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १,२०,९५,८५५ झाली असून एकूण मृतांची संख्या १,६२,११४ वर पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांत कोरोनातून ३७,०२८ नागरिक पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात ५,४०,७२० सक्रिय रुग्ण आहेत. सोमवारी देशात ६८००० रुग्ण आढळले होते. ऑक्टोबर २०२० नंतर एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ होती.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार, २९ मार्च रोजी ७,८५,८६५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आजअखेर २४,२६,५०,०२५ एकूण नमुने तपासण्यात आले आहेत. ३० मार्च रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत ६,११,१३,३५४ जणांना लस देण्यात आली आहे. भारतात १६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यतील लसीकरण सुरू करण्यात आले. दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू करण्यात आला असून एक एप्रिलपासून सरकार ४५ वर्षांवरील सर्वांना लस देणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here