नवी दिल्ली: रशियाच्या कोरोना वैक्सीन ला भारतात विकण्यासाठी भारतातील मोठी फार्मा कंपनी डॉ .रेड्डीज यांच्या बरोबर करार झाला आहे. रशिया येथील सॉवरेन वेल्थ फंड (Sovereign Wealth Fund) आरडीआईएफ (RDIF-Russian Direct Investment Fund) भारताचे डॉ. रेड्डीज (Dr Reddy’s) यांना १० करोड डोस विकणार आहेत. यासाठी भारताकडून सर्व मंजुरी मिळाली आहे. या बातमीनंतर डॉ. रेड्डीज यांच्या शेयर मध्ये एकदम गती आली. बुधवारी कंपनीचा शेयर 4.36 टक्क्याने वाढून 4,637 रुपयांच्या दरावर बंद झाला.
रुसच्या कोरोना वैक्सीन ला रशिया ने ‘स्पूतनिक वी’ हे नाव दिले आहे. रशियाच्या भाषेत स्पूतनिक शब्दाचा अर्थ सैटेलाइट असा होतो. रुस ने जगातील पहिला सैटेलाइट बनवला होता ,त्याचे नाव ही स्पूतनिक असेच ठेवले होते.
यासाठी नव्या वैक्सी्न च्या नावाबाबत असेही म्हटले जात आहे की, रुसला पुन्हा एकदा अमेरिकेला दाखवून द्यायचे आहे की, वैक्सीन च्या रेस मध्ये त्यानी अमेरिकेला मात दिली आहे, ज्याप्रमाणे वर्षांपूर्वी अंतराळाच्या रेसमध्ये सोवियत संघाने अमेरिकेला मागे टाकले होते.
रशिया 11 ऑगस्ट ला कोविड 19 च्या वैक्सीन ला मंजुरी देणारा जगातील पहिला देश बनला होता. हे वैकसीन पुढच्या वर्षी 1 जानेवारी पासून सामान्य लोकांना उपलब्ध होईल. रशिया च्या गैमेलिया रिसर्च इंस्टीट्यूट आणि रक्षा मंत्रालयाकडून संयुक्तपणे विकसित स्पूतनिक-5′ च्या नावाने ओळखली जाणारी कोरोना वैक्सीन सर्वात पहिल्यांदा कोरोनाग्रस्तांच्या उपचारामध्ये असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली आहे. या वैक्सीन चे उत्पादन संयुक्तपणे रशिया प्रत्यक्ष गुंतवणूक कोषाकडून केले जात आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.