नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे २ लाख ५९ हजार १७० रुग्ण आढळले आहेत. तर याच कालावधीत तब्बल १ हजार ७६१ जणांचा मृ्त्यू झाला आहे. दिवसभरात १ लाख ५४ हजार ७६१ जण कोरोनापासून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १ कोटी ५३ लाख २१ हजार ८९ झाली आहे. तर यापैकी १ कोटी ३१ लाख ८ हजार ५८२ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर १ लाख ८० हजार ५३० जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. सद्यस्थितीत देशभरात एकूण २० लाख ३१ हजार ९७७ जण उपचार घेत आहेत.
दुसरीकडे कोरोना विरोधातील सर्वात मोठे लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १२ कोटी ७१ लाख २९ हजार ११३ जणांना डोस देण्यात आला आहे. केंद्र सरकारने नुकतीच एक मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान रुग्णसंख्या गतीने वाढ आहे. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ स्तरावर बैठका सुरू केल्या आहेत. मंगळवारी पंतप्रधान देशातील लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा करणार आहेत. त्यातून लस निर्मितीला गती येईल.