नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा फैलाव भारतात गतीने वाढत आहे. भारतातील संक्रमण जगात उच्चांकी झाले आहे. देशात गेल्या २४ तासांत ३,३२,७३० नवे रुग्ण आढळले आहेत. जगातील कोणत्याही एका देशात आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिनीनुसार, देशात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १,६२,६३,६९५ झाली आहे. आतापर्यंत एकूण १,८६,९२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या २४,२८,६१६ झाली आहे. तर आतापर्यंत १,३६,४८,१५९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.
देशात गेल्या २४ तासात ३१,४७,७४२ जणांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १३,५४,७८,४२० जणांना लस देण्यात आली आहे. केंद्र सरकारने आता कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसीकरणावर जोर दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाचे संक्रमित रुग्णांपैकी ५९.१२ टक्के रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये आहेत.
इंडियन मेडिकल रिसर्च कौन्सिलच्या अहवालानुसार कालपर्यंत एकूण २७,४४,४५,६५३ नमुने चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी १७,४०,५५० चाचण्या काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत.