नवी दिल्ली: कोरोना वायरस च्या नव्या यूके स्ट्रेनमुळे केंद्र सरकारने ब्रिटेनमधून वाहतुक करणार्या हवाई उड्डाणांवर लागू केलेल्या प्रतिबंधाला 7 जानेवारीपर्यंत वाढवले आहे. केंद्रीय नागरीक उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, 7 जानेवारी 2021 पर्यंत यूनाइटेड किंगडम मधून येणारी आणि तिथे जाणारी सर्व प्रकारची विमान वाहतुक सेवा अस्थायी निलंबनाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय नागरीक उड्डाण मंत्री हरदीप पुरी यानीं ट्वीट केले की, 7 जानेवारी 2021 पर्यंत ब्रिटेन मध्ये येणार्या जाणार्या उड्डाणांचा अस्थायी निलंबनाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रिटेनमध्ये कोरोनाचा नवा वैरिएंट मिळाल्यानंतर जगभरातील देशांमध्ये भूकंप आला आहे. हे लक्षात घेता भारताने 21-22 डिसेंबर च्या मध्यरात्रीपासून ब्रिटेन मधून येणारी सर्व उड्डाणांवर प्रतिबंध लागू केला होता. तसेच देशातून ब्रिटेनमध्ये जाणार्या उड्डाणांवरही प्रतिबंध लागू केला होता. केंद्र सरकारने आता सात जानेवारी पर्यंत तो वाढवला आहे. भारताशिवाय फ्रान्स, जर्मनी, नीदरलैंड सह अनेक यूरोपीय देशांनीही ब्रिटेनवर हवाई प्रतिबंध लावला आहे.
देशामध्ये यूके च्या कोरोना स्ट्रेन मुळे संक्रमित होणार्यांची संख्या वाढून 20 झाली आहे. मंगळवारपर्यंत ही संख्या केवळ 6 होती. आतापर्यंत एकूण 107 सैंपल चा रिपोर्ट आला आहे, ज्यामध्ये 20 यूके स्ट्रेन पासूॅन संक्रमित आढळले आहेत. 20 पैकी सर्वात जास्त 8 पौजिटिव्ह रुग्ण एनसीडीसी दिल्ली च्या लॅब मध्ये आढळले आहेत.