नवी दिल्ली: कोरोनाचा कहर देशभरात पसरला आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ३.५२ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात कोरोनाचे नवे ३,५२,९९१ रुग्ण आढळल्यानंतर संक्रमितांची एकूण संख्या १,७३,१३,१६३ झाली आहे. तर २८ लाख रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासात २८१२ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या १,९५,१२३ झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या १,४३,०४,३८२ झाली आहे. मृत्यूदरात घसरण होऊन तो १.१३ टक्क्यांवर आला आहे. तर देशभरात आतापर्यंत १४,१९,११,२२३ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिलअखेर २७,९३,२१,१७७ नमुन्यांची तपासणी झाली आहे. त्यापैकी १४,०२,३६७ नमुने रविवारी तपासण्यात आले.