कोपरगाव : कोरोना चे गांभीर्य लक्षात घेवून शासनाच्या अवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी कारखाना व उद्योगसमुहातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व कर्मचार्यांना 31 मार्च पर्यंत पगारी सुट्टी जाहीर केली आहे.
याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी मानवतावादी दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून कंत्राटी कामगारांचे अर्थिक नुकसान होवू नये, यासाठी कारखान्याच्या सर्व कंत्राटी कामगारांच्या बाबतीतही हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच कर्मचार्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व बैठका, समारंभ, कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.
साखर आयुक्तांच्या परिपत्रकानुसार कारखाना परिसरात सर्वत्र पोस्टर्स, फ्लेक्स बोर्ड लावून व सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. आमदार आशुतोष काळे यांनी सर्व कर्मचार्यांना स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यकर्त्यांनीदेखील घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.