नवी दिल्ली : कोरोना वायरस मोठ्या प्रमाणात भारतात फैलावत आहे. आज पुन्हा एक नवीन रेकॉर्ड रुग्ण संख्या समोर अली आहे . ज्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 33 लाख 87 हजारावर पोचली आहे. तर एका दिवसात 1,057 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
आकड्यांनुसार, 24 तासात 77,266 नवे रुग्ण समोर आल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 33,87,501 इतकी झाली आहे. ज्यापैकी 25,83,948 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यानंतर एकूण 7,42,023 अॅक्टीव्ह रुग्ण बाकी आहेत. तर मरणार्यांची संख्या 61,529 इतकी झाली आहे.
याशिवाय देशभरात एकूण चार करोडपेक्षा अधिक टेस्ट करण्यात आल्या आहेत. इंडियन काउंसिंल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 26 ऑगस्टपर्यंत देशभरात 3,94,77,848 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. ज्यापैकी 9,01,338 नमुने काल तपासण्यात आले आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.