विजयवाडा : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत असलेल्या बिलांबाबत त्वरीत पावले उचलावीत असे पत्र भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (सीपीआय) राज्य सचिव के. रामकृष्ण यांनी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांना लिहिले आहे. राज्य सरकारने १२० कोटी रुपयांची ऊस बिले त्वरीत मिळावीत यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे, असे रामकृष्ण यांनी सांगितले.
याबाबत द हिंदूमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, पोलिसांकडून ऊस बिलांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात खोटे खटले दाखल केले जात असल्याचा आरोप रामकृष्ण यांनी केला आहे. ते म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीवेळी सत्ता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली गेली. मात्र, त्याचा आता सर्वांना विसर पडला आहे. अशा प्रकारची फसवणूक करणे गैर आहे.