नवी दिल्ली : देशभरात कोरोना संक्रमणाचा फैलाव वेगाने सुरू आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे १६.७३८ रुग्ण आढळून आले आहेत. याबरोबरच एकूण संक्रमित रुग्णांची संख्या १,१०,४६,९१४ झाली झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १ लाख ५१ हजार ७०८ आहे.
केंद्राय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासांत ११,७९९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १,०७,३८,५०१ जण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासात १३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर मृतांचा एकूण आकडा १,५६,७०५वर पोहोचला आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट वाढू लागले आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात चार महिन्यानंतर, कोरोना संक्रमणाचे ८८०७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर संक्रमित व्यक्तींची संख्या २१ लाख २१ हजार ११९ झाली आहे. तर ८० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
देशभरात २४ फेब्रुवारीपासून देशभरात १ कोटी २६ लाख ७१ हजार १६३ आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांना कोविड १९चे लसीकरण करण्यात आले आहे.