नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूचे संक्रमण गतीने वाढत आहे. गेल्या चोवीस तासात कोविड १९चे १७ हजार ९२१ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबतच एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,१२,६२,७०७ झाली आहे. मंगळवारी कोरोनामुळे १३३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १,५८,०६३ झाली आहे.
दरम्यान, देशात आता कोरोनाचे सक्रिय १,८४,५९८ रुग्ण उपचार घेत आहेत. तर कोरोनाच्या उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेले १,०९,२०,०४६ लोकांना घरी पाठविण्यात आले आहे. तर देशात २,४३,६७,९०६ लोकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत कोरोनाच्या संक्रमणाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत २२,३८,३९८ लोक संक्रमित झाले आहेत. तर ५२,५५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर केरळ आहे. दक्षिण भारतातील या राज्यात आतापर्यंत १०,८१,४०४ लोक कोरोनामुळे संक्रमित झाले. तर आतापर्यंत ४,३२८ जणांचा मृ्त्यू झाला आहे.