नोकरीचे आमिष दाखवून साडे चार लाखाला फसवले

महेवागंज: थाना फूलबेहड येथील सिसौरा गावात राहणार्‍या युवकाने साखर कारखान्याचा अधिकारी आणि त्याच्या मुलावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून साडे चार लाख रुपयाला फसवल्याचा आरोप केला आहे.

सिसवारा गावातील एका युवकाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, त्यांने तहसील मध्ये कम्प्यूटर ऑपरेटर म्हणून भर्ती होण्यासाठी अर्ज दिला होता. दरम्यान, या परिसरात असणार्‍या एका साखर कारखान्याचे ओळखीचे अधिकारी आणि त्यांच्या मुलाने नोकरी देण्याबाबत पक्का विश्‍वास दाखवला. आरोप आहे की, अधिकारी आणि त्यांच्या मुलाने आमची शासकीय ओळख चांगली आहे, असे सांगून नोकरी देतो असे बोलून त्यांच्याकडून साडे चार लाख रुपये घेतले. बर्‍याच दिवसांनंतरही नोकरी न मिळाल्याने त्या युवकाने त्यांच्याकडे पैसे मागितले. त्यावेळी या पिता पुत्राने पैसे देतो म्हणून सांगितले. बर्‍याच दबावानंतर जानेवारीमध्ये एक चेक दिला. पण पुरेसे पैसे खात्यात नसल्याने चेक परत आला. यावेळी आपण पूर्णपणे फसवलो गेलो असल्याची त्या युवकाला जाणिव झाली. त्यानंतर त्याने आरोपींना तीन फेब्रुवारीला रजिस्टर्ड पोस्टतर्फे नोटीस पाठवली. त्याचे उत्तर न मिळाल्याने युवकाने पोलिसांकडे धाव घेतली. ठाण्याचे प्रभारी पारसनाथ यादव यांनी सांगितले की, पिडीत युवकाने दोन दिवसांपूर्वीच रुपये परत मिळाल्याचे आणि तडजोड झाल्याचेही सांगितले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here