हंगामामध्ये वजनात काटामारी केल्यास गुन्हे दाखल होणार

महराजगंज : आगामी गळीत हंगामात ऊस खरेदी केंद्रांवर वजन करताना होणारी काटामारी रोखण्यासाठी ऊस विभागाने पुढाकार घेतला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना काटामारी रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गळीत हंगामात कोणत्याही साखर कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्रावर काटामारी केली जावू नयेत अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारींची पडताळणी करावी असे ऊस आयुक्तांनी म्हटले आहे. अशा प्रकारच्या तक्रारी तपासाव्यात, आणि त्यामध्ये जर तथ्य असेल तर ऊस अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर एफआयआर दाखल करावा असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here