कोल्हापूर, दि. 19: महाराष्ट्रातील विदर्भासह 14 जिल्ह्यात या वर्षी पाऊस कमी झाला आहे. याचा परिणाम उसासह इतर पिकांवर झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात हे जाहीर केले आहे.
महाराष्ट्रात यावर्षी काही जिल्ह्यांमध्ये धुवाधार पाऊस झाला तर विदर्भासह इतर जिल्ह्यामध्ये खूपच तुरळक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दुष्काळाचे संकट ओढवले आहे. भविष्यात या चौदा जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांमध्ये ही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2017- 2018 सालच्या जून मध्ये सर्वत्र चांगला पाऊस झाला त्यानंतर, जूनच्या अखेरीस पावसाचे हे प्रमाण कमी-कमी होत राहिले. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पिण्याचे पाणी मिळणेही कठीण झाले आहे.
पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकर्यांना त्रास होत आहे. कमी पर्जन्यमानामुळे या क्षेत्रामध्ये धरणातील पाणी देखील कमी झाले आहे. महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधील दुष्काळ प्रभावित आहे.