गोहाना ( सोनीपत ) : कोरोना महामारीचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. महामारी पसरल्याने कामगार आपापल्या गावाला निघून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना कामगारांचा तुटवडा भासत आहे. चौधरी देवीलाल साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अद्याप शेतांमध्ये सुमारे अडीच लाख क्विंटल ऊस शिल्लक आहे. आपला शिल्लक राहीलेला ऊस तोडून तो कारखान्यापर्यंत कसा पोहोचवायचा, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
ऊस तोडणीचे काम शेतकऱ्यांना आव्हानात्मक बनले आहे. ऊस तोडणीसाठी कामगार तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. आहुलाना येथे चौधरी देवीलाल सारखान्याने आठवड्यापूर्वी उसाचा सर्व्हे केला. येथे अडीच लाख क्विंटल ऊस असल्याचे अनुमान आहे. ऊस उत्पादक शेतकरी संदीप छिछडाना आणि कृष्ण मलिक यांनी सांगितले की, ऊस तोडणीसाठी बिहार आणि तर प्रदेशांतून कामगार येतात. एप्रिल महिन्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागू होण्याच्या धास्तीने कामगारांनी पळ काढला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सध्या अनेक शेतकरी ऊस लागण करीत आहेत. या कामातही कामगारांची कमतरता भासत आहे. भारतीय किसान युनीयनचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यवान नरवाल यांनी सांगितले की, साखर कारखाने उशीरा सुरू केले जातात. परिणामी उसाचे गाळप वेळेवर होत नाही. जर कारखाने १ नोव्हेंबर पासून सुरू झाले तर मार्च अखेरीस गाळप पूर्ण होऊ शकते. सद्यस्थितीत उसाच्या तोडणीचा दर ४५ रुपये प्रती क्विंटल आहे. मात्र, उन्हाळ्यात हा दर दुप्पट होतो. सध्या शेतकऱ्यांना ७० ते १०० रुपये दर द्यावा लागत आहे. उन्हाळ्यामुळे उसाचे वजन घटत असल्याने शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूने नुकसान होत आहे.