नवी दिल्ली : चीनी मंडी
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेने इराणच्या तेल निर्यातीवर लादलेल्या निर्बंधांमुळे जगभरात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. जगातील तेलाची वाढती मागणी आणि व्हेनेझुएलामधून कमी झालेला पुरवठा यांमुळे कच्च्या तेलाचे भाव ७८ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत आणि येत्या काही दिवसांत ते ८० डॉलरपर्यंत (मे महिन्यातील उच्चांकी दर) जाण्याची शक्यता आहे.
भारताचा विचार केला, तर येथील तेल कंपन्यांनी इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांप्रमाणे रोज बदलतील, अशी व्यवस्था लागू केली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकाला रोज पेट्रोल-डिझेल दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. मुळात मागणी आणि पुरवठ्याचे सूत्र तेलाच्या किमतींवर सर्वांत प्रभावी ठरते. अनुमान आणि तर्कसंगतीवरच बाजारातून दबाव येतो आणि त्यातूनच पुढे तेलाच्या किमती निश्चित केल्या जातात.
ब्रेंट क्रूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचे व्यवहार आंतरखंडीत होत असतात. या तेलाचे दर जागतिक बाजारपेठेत मापदंड मानले जातात. त्याच्या बरोबरीला वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट क्रूड हे तेल दुसरा मापदंड मानले जाते. पण, केवळ उत्तर अमेरिकेतील न्यूयॉर्क मर्कंटाइल बाजारातच त्याची विक्री होते. कच्च्या तेलाची त्या क्षणाची किंमत आणि भविष्यातील संभाव्य किंमत यावरूनच गुंतवणूकदारांचा कल ठरत असतो.
ओपीईसी
दी ऑर्गनायझेशन ऑफ दी पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रिज् (ओपीईसी) या संस्थेवर जगातील एकूण तेल पुरवठ्याच्या ४० टक्के पुरवठ्याची जबाबदारी आहे. तर उर्वरीत ६० टक्के पुरवठा जागतिक बाजारातून होतो. अल्जेरिया, अंगोला, इक्वेडोअर, इंडोनेशिया, इराक, इराण, कुवेत, लिबाया, नायजेरिया, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि व्हेनेझुएला हे ओपीईसीचे सदस्य देश आहेत.
तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम काय?
तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम स्थानिक आणि जागतिक दोन्ही बाजारपेठांवर होतो. दी एस अँड पी बीएसई ऑईल आणि गॅस इंडेक्सचे ११ टक्के वायटीडीचे नुकसान झाले आहे भारतात कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांमुळे रुपया घसरला आहे. गेल्या वर्षभरात जवळपास १३ टक्क्यांनी रुपयाची घसरण झाली आहे.