कच्चे तेल ७६ डॉलरवर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा दर

नवी दिल्ली : एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी दिसून येत आहेत. एप्रिलमध्ये ८७ डॉलर प्रती बॅरल असलेले कच्चे तेल आता ७६ डॉलर प्रती बॅरलवर आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज, ११ मे रोजी ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत ७६.९६ डॉलर प्रती बॅरल आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूड ७३.०७ डॉलर प्रती बॅरल आहे. त्यानंतरही देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. गेल्या वर्षी २२ मे नंतर देशात इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकृत iocl.com वरील माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपयांवर स्थिर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. चेन्नई पेट्रोल १०२.६३ आणि डिझेल ९४.२४ रुपये आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटरवर स्थिर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या आधारावर ऑईल मार्केटिंग कंपन्या किमतीचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरांची निश्चिती करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या विविध शहरांतील इंधन दरात अपडेट करतात. एका SMSवर तुम्ही शहरातील पेट्रोल, डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP लिहून मेसेज ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here