नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रती बॅरल ८० डॉलरच्या पुढे आहे, तर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई यासह सर्व महानगरांमध्ये आज २३ फेब्रुवारी रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. ब्रेंट क्रूड तेल प्रती बॅरल ८० डॉलरच्या वर आहे. जानेवारीमध्ये ते ८५ डॉलरवर पोहोचले होते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, २२ मे २०२२ रोजी केंद्र सरकारने देशभरातील पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ९६.७२ रुपये प्रती लिटर आणि डिझेलचा दर ८८.६२ रुपये प्रती लिटरवर स्थिर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज ब्रेंट क्रूड ते प्रती बॅरल ८०.६१ डॉलर आहे. दुसरीकडे, डब्ल्यूटीआय कच्चे तेल प्रती बॅरल ७४.०५ डॉलरवर ट्रेड करत आहे. भारतीय इंधन कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आजदेखील देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली ते मुंबई आणि कोलकाता ते चेन्नई या सर्व महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटरवर स्थिर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०२.६३ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९४.२३ रुपये प्रती लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये दराने विकले जात आहे.