क्रूड ऑईल महागले, जाणून घ्या देशभरातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतल्याचे दिसून येत आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये ब्रेंट क्रूड ऑईल ८६ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होण्याची शक्यता कमीच आहे. भारतीय बाजारात पेट्रोलचे दर स्थिर आहेत. राष्ट्रीय स्तरावर देशभरात इंधन दरात शनिवारी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपयांवर स्थिर आहे. चेन्नई पेट्रोल १०२.६३ आणि डिझेल ९४.२४ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. इंडियन ऑईलच्या अधिकृत iocl.com या वेबसाइटवर दिलेल्या वृत्तानुसार आज, इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या आधारावर ऑईल मार्केटिंग कंपन्या किमतीचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरांची निश्चिती करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या विविध शहरांतील इंधन दरात अपडेट करतात. एका SMSवर तुम्ही शहरातील पेट्रोल, डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP लिहून मेसेज ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here