नवी दिल्ली : चीनमधील कोळसा संकटाचे परिणाम इंधन दरावर दिसून येत आहेत. ब्रेंट क्रूडचे दर ०.४० टक्के वाढून ८४.०५ डॉलरवर पोहोचले. याशिवाय डब्ल्यूटीआय क्रुडचा दर ८० डॉलरवर आला. देशांतर्गत बाजारपेठेचा विचार करता आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. आयओसीएलच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, आज इंधन दर स्थिर आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून डिझेल दरात ३.३० रुपयांची वाढ झाली आहे. एक ऑक्टोबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. फक्त चार ऑक्टोबर रोजी दरात बदल झाला नाही. या दिवसाचा अपवाद वगळता इतर सर्व दिवशी इंधन दरात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात या महिन्यात आतापर्यंत २.८० रुपयांची वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आज पेट्रोल १०४.४४ रुपये तर डिझेल ९३.१७ रुपये प्रती लिटर दराने विक्री होत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ११०.३८ रुपये आणि डिझेल १०१.०३ रुपये प्रती लिटर झाले आहे.
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या इंधन कंपन्यांकडून दररोज सकाळी विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातात.
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना (आयओसीएल) RSP हा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. त्याची माहिती तुम्हाला आयओसीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link