नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलची किंमत ०.४५ टक्के वाढून ६८.२६ डॉलर प्रती बॅरलवर ट्रेड करीत आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईल १.१७ टक्के वाढून ७३.२८ डॉलर प्रती बॅरलवर आहे. यादरम्यान, तेल कंपन्यांनी सोमवारी, २० मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. नव्या दरानुसार, सध्या इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपयांवर स्थिर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नई पेट्रोल १०२.६३ आणि डिझेल ९४.२४ रुपये आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. नोएडामध्ये पेट्रोल २४ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर गुरुग्रामध्ये डिझेल १९ पैशांनी महागले आहे. लखनौमध्ये पेट्रोलच्या दरात ५ पैशांची घट झाली आहे.
तुम्ही एका SMSवर तुम्ही शहरातील पेट्रोल, डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या आधारावर ऑईल मार्केटिंग कंपन्या किमतीचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरांची निश्चिती करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या विविध शहरांतील इंधन दरात अपडेट करतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP लिहून मेसेज ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागेल. त्यानंतर काही क्षणात तुम्हाला अपडेट माहिती मिळेल.