कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, मात्र पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने घसरत आहेत. अशा स्थितीत क्रूड ऑईलच्या दरात घसरण होत असल्याने त्याचा पेट्रोल-डिझेलच्या दरावर काही परिणाम होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. आजही पेट्रोल-डिझेलचे जुने दर कायम आहेत.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या बड्या कंपन्यानी २ सप्टेंबर २०२२ साठीचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल ९६.७२ रुपये प्रती लिटर आणि डिझेलची ८९.६२ रुपये प्रती लिटरच्या दराने विक्री केली जात आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज पेट्रोल १०६.३१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रती लिटर तसेच कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ प्रती लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here