क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा घेतली उसळी, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा दर

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचा दर पुन्हा वधारला आहे. ताज्या घडामोडीनुसार, ब्रेंट क्रूड ७७ डॉलर प्रती बॅरल आहे. भारतीय बाजारात राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मात्र, विविध राज्यांमध्ये स्थानिक स्तरावरील करामुळे किमतींमध्ये थोडाफार बदल दिसू शकतो.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ७५.५८ डॉलर तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल ७१.५५ डॉलर प्रती बॅरल आहे. दुसरीकडे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपयांवर स्थिर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. चेन्नई पेट्रोल १०२.६३ आणि डिझेल ९४.२४ रुपये आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटरवर स्थिर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या आधारावर ऑईल मार्केटिंग कंपन्या किमतीचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरांची निश्चिती करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या विविध शहरांतील इंधन दरात अपडेट करतात. एका SMSवर तुम्ही शहरातील पेट्रोल, डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP लिहून मेसेज ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here