कोल्हापूर, ता. 2 : सध्या सुरू असलेली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी २४ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, त्यानंतर लगेचच दिवाळीला सुरुवात होणार आहे. यामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबर महिना उजाडणार आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे या तीनही जिल्ह्यातील यंदाचा ऊस हंगाम संकटात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 73 हजार हेक्टर ऊस खराब झाला आहे त्यामुळे साखर कारखान्यांना ऊसासाठी जिल्हा बाहेरही जावे लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. याच पूरस्थिती आणि निवडणुकीमुळे यावर्षीचा साखर हंगाम थोडा लांब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्यावर्षी 11 नोव्हेंबरला गळीत हंगाम सुरु झाला होता, यावर्षी मात्र 20 नोव्हेंबरला सुरू होईल अशी शंका व्यक्त केली जात आहे.
वर्ष हंगाम सुरू दिनांक
२०१४-१५…….१२ नोव्हेंबर
२०१५-१६…….१२ नोव्हेंबर
२०१६-१७…….९ नोव्हेंबर
२०१७-१८…….८ नोव्हेंबर
२०१८-१९…….११ नोव्हेंबर
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.