हरिद्वार : कॅबिनेट मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांच्या निर्देशानंतर साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. इकबालपूर आणि लिब्बरहेडी कारखान्यांचे गाळप मंगळवारी आणि लक्सरमध्ये बुधवारपासून गाळप सुरू झाले. कारखान्यांनी नियमीत गाळप सुरू ठेवावे आणि खरेदी केंद्रातून ऊस तातडीने उचलावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. साखर कारखान्यांच्या प्रशासनाने समित्यांसोबत समन्वय ठेवून ऊस तोडणी इंडेंट जारी करावे असे आदेश देण्यता आले आहेत.
बुधवारी स्वामी यतीश्वरानंद यांनी कँम्प कार्यालयात साखर कारखान्याशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. कारखान्यातील गाळप नियमीत सुरू राहावे, त्यात टाळाटाळ करू नये अशा सूचना त्यांनी केली. लवकर ऊस तोडणी झाल्यास शेतकरी गहू आणि मोहरीची लागवड लवकर करू शकतात. समित्यांनी इंडेंट जारी करताना योग्य पद्धतीने काम करावे असे ते म्हणाले.