एनएसआयच्या कारखान्यात होणार ऊस गाळपासाठी नव तंत्राचा वापर

कानपूर : नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट (National Sugar Institute) कानपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर साखर कारखान्यात मंगळवारी गाळप हंगाम २०२१-२२ सुरू करण्यात आला आहे. शुगर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक प्रशिक्षण मिळावे यासाठी हा कारखाना चालवला जातो. या कारखान्यात उस उत्पादकता, उसाची परिपक्वता व्यवस्थापन आदींचा अभ्यास करणारे विद्यार्थी ऊसाच्या वेगवेगळ्या प्रजाती ओळखणे, ऊस तोडणी कार्यक्रम तयार करणे, उसाचा पुरवठा सुरळीत ठेवणे या बाबींचा अभ्यास करतात.

केंद्राचे संचालक प्रा. नरेंद्र मोहन यांनी सांगितले की, कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. मागणीनुसार कच्ची साखर, प्रक्रिया केलेली साखर उत्पादीत करण्याची क्षमता वाढविण्यात आली आहे. देशातील हे एकमेव युनिट आहे, जिथे साखरेचे द्रावण, आयन एक्सचेंज राळ आणि सक्रिय कार्बन पावडर पद्धत साफ करण्यासाठी दोन भिन्न तंत्रज्ञान वापरले जाते. शर्करा प्रयोगशाळेतील अभियांत्रिकी प्रमुख अनुप कनौजीया यांनी सांगितले की, गळीत हंगामावेळी नव्या तंत्रानुसार कन्डेसरसाठीच्या पाणी वापराचे प्रमाण मर्यादित ठेवण्यासाठी लावलेल्या ऑटोमेशन व्यवस्थेचे परीक्षण केले जाईल. शुगर प्रोसेसिंगच्या प्रयोगात यश मिळाले की चांगल्या गुणवत्तेची साखर मिळेल असे शर्करा तंत्रज्ञान विभागाचे प्रा. डॉ. जाहर सिंह यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here