दौराला साखर कारखान्याचे गाळप ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार

दौराला : दौराला साखर कारखान्याचा वर्ष २०२२-२३ मधील ऊस गळीत हंगाम ३० ऑक्टोबरपासून सुरू होईल. साखर कारखान्याचे वरिष्ठ ऊस महाव्यवस्थापक संजीव खतियान यांनी सांगितले की, साखर कारखान्याला १६५ ऊस खरेदी केंद्रे मंजूर झाली आहेत. यापैकी १४५ खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तर उर्वरीत केंद्रे लवकरच स्थापन केली जाणार आहेत.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, महाव्यवस्थापक खतियान यांनी सांगितले की, २८ ऑक्टोबरपासून खरेदी केंद्रावर २८ ऑक्टोबरपासून ऊस खरेदी सुरू केली जाईल. तर ३० ऑक्टोबर रोजी विधीवत ऊसाचे गाळप सुरू करण्यासह कारखान्याच्या गेटवर ऊस खरेदी सुरू केली जाईल. शेतकऱ्यांनी स्वच्छ ऊस कारखान्याला पुरवावा असे आवाहन महाव्यवस्थापकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here