ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रिस्टल क्रॉपकडून हर्बिसाईड होलाचे लाँचिंग

मुंबई : ॲग्रोकेमिकल फर्म क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनने शेतकऱ्यांच्या उसाच्या पिकाला रोगापासून वाचविण्यासाठी आणि उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रासारख्या प्रमुख उत्पादक राज्यांतील उत्पन्न वाढीसाठी हर्बिसाइड होला (Hola herbicide) चे लाँचिंग केले आहे. विविध राज्यांतील कृषी विद्यापीठांमध्ये होलाचे परिक्षण करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी याची २००० ठिकाणी प्रात्यक्षिके घेण्यात आली. शेतकऱ्यांसाठी अरुंद पानाच्या तसेच रुंद पानाच्या तणांची तसेच शेंड्याची समस्या असते, खास करुन सायपेरस रोटंडस (मोथा) च्या नियंत्रणासाठी होला प्रभावी असल्याचे सांगण्यात आले.

क्रिस्टल क्रॉपचे वरिष्ठ उपाध्यक्ष सी. एस. शुक्ला म्हणाले, आम्ही लवकरच याचे पेटंट मिळवणार आहोत. भविष्यकाळात ऊस उत्पादक शेतकरी भारतीय कृषी आणि अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका निभावतील. त्या अनुषंगाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आमच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमकडून विकसित करण्यात आलेल्या नवा तणनाशकाचे लाँचिंग करण्याबाबत उत्साही आहोत. यातून ऊस उत्पादकांना आपले उत्पादन वाढवता येईल. शुक्ला यांनी सांगितले की, कंपनीच्या योजनेनुसार आगामी काळात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तामीळाडू आणि गुजरातमधील ऊस उत्पादकांना होला उपलब्ध करून दिले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here