हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
हवाना (क्युबा): चीनी मंडी
अपुरी साधने आणि योग्य नियोजनाच्या अभावी क्युबामध्ये साखर उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, यावर मात करत क्युबाने पुरेसे साखर उत्पादन घेतले असून, स्थानिक बाजारपेठेबरोबर आपल्या निर्यातदारांच्या गरजाही पूर्ण केली आहे. क्युबामधून प्रामुख्याने चीन आणि युरोपीमधील काही देशांना साखर निर्यात होते. यंदा या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नाही तसेच स्थानिक बाजारातही साखरेचा योग्य पुरवठा होईल, असे मत क्युबाच्या अझक्युबा संस्थेचे आंतरराष्ट्रीय विषयांचे संचालक लौरडेस कास्टेल्लानोस यांनी सांगितले.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात क्युबाच्या साखर हंगामाला सुरुवात झाली. फेब्रुवारी अखेर क्युबाने ८२ टक्के साखर उत्पादनाचे टार्गेट पूर्ण केले असून, अजून हंगामाचे दोन महिने शिल्लक आहेत. क्युबामध्ये यंदा १५ लाख टन साखर उत्पादन होणे अपेक्षित असून, त्यातील ९ लाख २० हजार टन साखर निर्यात होणार आहे. क्युबाचे अर्थ आणि नियोजन मंत्री अल्जेंड्रो गिल यांनी गेल्या डिसेंबरमध्ये तेथील संसदेत ही माहिती दिली होती. क्युबामध्ये साखर कारखान्यांमध्ये मोडकळीला आलेली यंत्रे, मोडलेले जनरेटर्स, बॉयलर्स, काही भागात पावसाचा व्यत्यय आणि उशिरा होणारी आयात साधने अशी अवस्था होती. आता बरीचशी साधने आयात करण्यात आली आहेत. त्यामुळे साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. साखरेसोबतच रम, मध आणि अल्कोहल या उत्पादनांनीही क्युबाची निर्यात योजना पूर्ण केली आहे. जुना साखर कारखान्यांमधील खराब यंत्रे बदलण्यासाठी काही मिशनरी आयात करावी लागणार आहे. त्यासाठी क्युबातील साखर उद्योगाकडे कॅश फ्लो नाही, हे त्यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे.
यंदाच्या हंगामात ३५ हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आलेली नाही. क्युबामध्ये साखर हे केवळ निर्यातीचे प्रमुख साधन नाही तर, यामुळे क्युबामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो तसेच, जनावरांचे खाद्य आणि वीज निर्मितीमध्येही साखर उद्योग मोलाची भूमिका बजावत आहे. यंदाच्या हंगामात आलेल्या अडचणींवर मात करण्यात अली असून, आता उर्वरीत दोन महिन्यांत अधिक अधिक साखर उत्पादनावर लक्ष केंद्रीत करावे लागले, असे मत क्युबाचे अध्यक्ष डिएझ कॅनेल यांनी व्यक्त केले आहे. कितीही अडचणी आल्या तरी क्युबा साखर उत्पादन करतच राहणार आणि आंतरराष्ट्रीय गरजा पुरवत राहील, असा विश्वास कॅनेल यांनी व्यक्त केला. साखर उद्योग हा क्युबामधील सर्वांत महत्त्वाचा उद्योग होता. १९९१मध्ये क्युबामध्ये ८० लाख टन साखर उत्पादन होत होते. पण, आता पर्यटन, आरोग्य सेवा, बायोटेक्नॉलॉजी आणि सिगार या उत्पादनांमध्ये साखर उद्योग आता मागे पडला आहे.