हवाना : क्युबाचे राष्ट्रपती मिगुएल डियाज-कॅनेल यांनी संचालक, औद्योगिक तंत्रज्ञ आणि ऊस उत्पादकांसाठी आयोजित एका परिषदेमध्ये देशातील साखर, कृषी व्यवसायात तंत्रज्ञान आणि संघटनात्मक बदल आणण्याचे आवाहन केले आहे. उत्पादनात विविधता आणली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डियाज़-कॅनेल यांनी सांगितले की, २०२१-२२ या पिक हंगामात फक्त ३६ कारखान्यांनी ६ मिलियन टनापेक्षा अधिक ऊसाचे गाळप केले आहे. आणि ४८० हजार टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. देशात गेल्या शंभर वर्षांमध्ये हे सर्वात कमी उत्पादन झाले आहे. कार्यशाळेत शंभरहून अधिक तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला. यामध्ये साखर उद्योगातील मुख्य समस्या, आव्हानांबाबतचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये शैक्षणिक, वैज्ञानिक आणि इतर क्षेत्रातील विशेषज्ञांनी सहभाग घेतला.
राष्ट्रपती मिगुएल डियाज़-कॅनेल यांनी सांगितले की, साखर उद्योग हा देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे सर्वंनी साखर उद्योगाच्या विकासासाठी पुढे येण्याची गरज आहे.