अमरोहा: चंदनपूरच्या त्रिवेणी साखर कारखान्याने रोग व किडीमुक्त ऊसाची लागवड केली आहे. हे ऊस पीक कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे आहे. येथील प्रगतीशील शेतकरी महेश अग्रवाल यांनी सीओजी 88 जातीच्या ऊसाची एक एकर जमिनीत लागवड केली. ऊसाच्या दोन डोळ्याच्या मधील अंतर 5 फूट ठेवण्यात आले आहे.
ऊस लागवडीपूर्वी त्यावर बीज प्रक्रिया करण्यात आली. महेश अग्रवाल यांनी सांगितले की, सीओजी 88 जातीचा ऊस पाच फूट अंतराने लावल्यामुळे 0238 पेक्षा अधिक उत्पादन होईल. गेल्या वर्षी एक एकर सीओजी 88 ची लागवड करुन याचा फायदा पाहिला आहे. या जातीमध्ये कोणताही रोग नाही. ज्यामुळे यावर होणार्या खर्चातही बचत होते. वर्षभरात जनावरांना हिरवा चारा मिळतो. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आमोद कुमार शर्मा यांनी शेतकर्यांना आवाहन केले की, सीओजी 88 जातीच्या ऊसाची लागवड करावी. ऊस महाव्यवस्थापक आरएस रावत, सहायक महाव्यवसथापक सुरेश शर्मा, सहायक महाव्यवस्थापकऊस विकास एके तिवारी यांनी शेतकर्यांना होणार्या फायद्याबाबत सांगितले. सहायक ऊस व्यवस्थापक मनीष अग्रवाल, सहायक ऊस अधिकारी सिकंदर शर्मा आणि कारखाना सुपरवाइजर नरेश शर्मा आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.