गुजरात: गुजरातच्या अहमदाबाद मध्ये कोरोनाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरले आहेत. शहरामध्ये वाढत्या संक्रमाणामुळे सरकारने इथे रोज रात्री कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात प्रशासनाने ही माहिती दिली.
गुजरात सरकारने अहमदाबाद मध्ये 20 नोव्हेंबरपासून रोज रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर्फ्यू कधीपर्यंत राहिल, याबाबत प्रशासनाने काहीही सांगितलेले नाही.
गुजरातमध्ये गेल्या 24 तासात 1,281 नवे कोरोनारुग्ण समोर आले आहेत. याबरोबरच राज्यामध्ये संक्रमितांची संख्या वाढून 1,91,642 इतकी झाली आहे. दरम्यान 1274 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या एका दिवसात आणखी आठ लोकांना आपला जिव गमवावा लागला आहे, ज्यानंतर राज्यामध्ये कोरोनामुळे मरणार्यांची संख्या 3,823 झाली आहे.