नवी दिल्ली : गंभीर आव्हाने असुनही भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचा गावा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केला. BOB Annual Banking Conference मध्ये बोलताना आरबीआय गव्हर्नर दास यांनी गंभीर जागतिक परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले. गव्हर्नर दास म्हणाले की, इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपया चांगल्या स्थितीत आहे. रुपयात गतीने उतार-चढाव अथवा अस्थिरता येऊ देणार नाही. आरबीआय बाजारात अमेरिकन डॉलरचा पुरवठा करीत आहे. तरलतेसाठी पूर्तता करत आहे. आरबीआयच्या या उपाययोजनेमुळे व्यावसायिकांना मदत मिळाली आहे.
एबीपी लाइव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, महागाईच्या लक्ष्यीकरणासाठी २०१६ मध्ये लागू केलेल्या मजबूत ढाचामुळे चांगले काम झाले आहे. महागाईचा स्तर कमी करण्याचे आरबीआयचे लक्ष आहे. आम्हाला लिक्विडीटी आणि दर वाढीचा निर्णय घेताना नेहमी वाढीसंबंधीचे उद्दीष्ट लक्षात ठेवले पाहिजे. आरबीआयची नेहमी पतधोरण आढावा समिती निर्णय घेते असेही शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.