नवी दिल्ली : बंगालच्या खाडीवर दबाव निर्माण केलेल्या एका चक्रीवादळाचा आज, ११ मे रोजी परिणाम दिसू शकतो. त्यामुळे अनेक राज्यांत जोरदार वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या खाडी नजीकच्या, किनारपट्टीवरील राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल तर इतरत्र तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, हे चक्रीवादळ १२ मे पर्यंत गंभीर रुप धारण करू शकते. त्यानंतर ते उत्तर-पूर्व दिशेकडे वळू शकते आणि १४ मेच्या दुपारपर्यंत दक्षिण पूर्वेला बांगलादेश आणि उत्तरी म्यानमारच्या किनारपट्टीवर पोहोचू शकते.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चक्रीवादळामुळे आज अंदमान, निकोबार द्वीपसमुहाच्या माध्यमातून मध्यम ते जोरदार पाऊस कोसळू शकते. त्यामुळे अंदमान आणि बंगालच्या दक्षिणपूर्व खाडीमध्ये समुद्राची स्थिती खूप खराब असेल. लाटा अधिक वेगाने उसळतील तर ५० ते ६० किमी प्रती तास तसेच काही काळ ७० किमी प्रती तास वेगाने वारे वाहतील. याशिवाय, कर्नाटक, केरळ, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. आसाम, तामिळनाडूसह सिक्कीमचा काही भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेशात एक ते दोन ठिकाणी पाऊस कोसळू शकतो.