नवी दिल्ली : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळाची शक्यता आहे. यामुळे कर्नाटक, गोवा, दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पाउस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज दुपारपर्यंत ही कमी दाबाची यंत्रणा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे निर्माण झालेले कायर नावाचे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत आहे. आज सायंकाळपर्यंत ते महारष्ट्रातील किनार्याकडे येण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. 110 किमी प्रतितास वेगाने वार्यासह हे तीव्र चक्रीवादळ दक्षिण ओमान आणि येमेन किनारपट्टीकडेही जाणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना शनिवारपर्यंत समुद्रात जावू नका असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
अरबी समुद्रावरील हे तिसरे चक्रीवादळ आहे. अरबी समुद्रावर अनेक चक्रीवादळ दिसणे सामान्य नाही. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळांचं प्रमाण अधिक आहे. परंतु यावर्षी अरबी समुद्र अतिशय सक्रीय आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या माघारीलाही विलंब झाला असल्याचे, आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.