कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील उसाला प्रती टन ३,२०० रुपये या दराने बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. कारखान्याकडे १५ नोव्हेंबरअखेर गळीतास आलेल्या ४३ हजार ३२९ मे. टन ऊसापोटी १३ कोटी ८६ लाख ५४ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांनी दिली. चालू वर्षी कारखान्याचे ५.५० लाख मे. टन गाळपाचे उद्दीष्ट आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्ष, आमदार पाटील म्हणाले की, कारखान्याची एफआरपी प्रती टन ३,०२० रुपये असताना संचालक मंडळाच्या धोरणानुसार उसास एकरकमी प्रती टन ३,२०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंतची ऊस बिले दिली आहेत. कारखान्याने यंदा १३ डिसेंबरपर्यंत १,७१,३५० मे. टन उसाचे गाळप करुन १,६३,५०० क्विटल साखर पोत्यांचे उत्पादन केलेले आहे. यावेळी संचालक, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील उपस्थित होते.