डी. वाय. कारखान्याची १५ डिसेंबरअखेरची बिले अदा : अध्यक्ष, आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने १ ते १५ डिसेंबर या पंधरवड्यात गाळप केलेल्या ७५,९४० मे. टन ऊसाचे ३२०० रुपयांप्रमाणे होणारे बिल अदा केले आहे. चालू गळीत हंगामातील तिसऱ्या पंधरवड्याचे २४ कोटी ३० लाख रुपयांचे ऊस बिल ऊस उत्पादक शेतकरी सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर जमा केले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी दिली.

आमदार सतेज पाटील म्हणाले की, कारखान्याने ९ जानेवारीअखेर ३,०५,६७० मे. टन उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत ३,०२,३०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. हंगामात ५.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामात बिगर अॅडव्हान्स तोडणी वाहतूक केलेल्या कंत्राटदारांची ३० नोव्हेंबरअखेरची ३८ लाख १० हजार रुपयांची बिलेही अदा केली आहेत. यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदकुमार पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here