सोमवार, 15 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे तसेच कमीतकमी विक्री किंमत वाढण्याची अफवा व इतर कारणांमुळे आज बाजारात सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे देशभरात चांगली मागणी दिसून आली. आज दिसणार्या तेजीच्या अनुषंगाने व्यापाऱ्यांनी असा अंदाज लावला आहे की जमा कोटाच्या 65 ते 70 टक्के अर्थात मे महिन्या चा विक्री न झालेला कोटा आणि जूनचा कोटा विकला गेला असेल. आज सकाळी बाजार स्थिर सुरु झाला, मात्र दिवसाच्या मध्यापर्यंत बाजार तेजीत येऊ लागला, मागणी वाढण्यास सुरवात झाली आणि किंमती वाढू लागल्या.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3175 रुपये ते 3230 रुपये प्रति क्विंटल राहिला. रिसेल रेट S/30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3275 रुपये ते 3500 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3440 रुपये ते 3550 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3360 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3191 रुपये ते 3200 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये ते 3250 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला.
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 383.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.87 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.092 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.0515 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2691, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 335.37 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 552.09 अंकांनी खाली येऊन 33,228.80 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 159.20 अंकांनी खाली येऊन 9,813.70 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.