‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

गुरुवार – १ ऑगस्ट २०१९

डोमेस्टिक मार्केट: ऑगस्टचा कोटा घोषित झाल्याने तसेच वर्षातील प्रमुख उत्सव जवळ येत असल्याने साखरेच्या मागणीत वाढ दिसून आली. महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव ३१०० ते ३१५० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३०९० ते ३१२० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३३४० ते ३३८० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३३२० ते ३३६० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३११० ते ३१५० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३२७५ ते ३३२५ रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजार आज स्थिर राहिला. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३२५.५० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार १२.१३ सेंट्स मध्ये झाला.
कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३२८ ते ३३० डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३४२ ते ३४५ डॉलर राहिले.

एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी १९७०० ते १९९०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २०६०० ते २०८०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ६९.०९ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ३.८ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ३०९८ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५७.८१ डॉलर होते.

इक्विटी : बीएसई सेंसेक्स ४६३ अंकांनी खाली येऊन ३७०१८ अंकांवर तर एनएसई निफ्टी १०५ अंकांनी वर चढून १०९८० अंकांवर बंद झाले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here